आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच घरातील चौघांची आत्महत्या:पती-पत्नीसह मुलांचा समावेश, मुंबईतील शिवाजीनगर भागातील घटना

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या शिवाजीनगर भागात बैंगनवाडी भागात एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या चार जणांमध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पती पत्नीने आत्महत्या करत मुलांनाही यात समाविष्ट केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मृतदेहांचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या विषयी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या माहितीनुसार, पती पत्नीने विष घेऊन मुलांनाही विष दिले. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इंदिरानगर झोपडपट्टीत बैंगनवाडी, शिवाजीनगर याठिकाणी हे मृतदेह आढळले आहे.

घराच्या आतमध्ये मृतदेह आढळून आले. आणि दरवाजाला आतून कडी लावलेली होती. त्यामुळे ही आत्महत्याच तर नव्हे ना असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये मृतांची नावेही समोर आली आहेत.

मृतांची नावे

1) शकील जलील खान, वय 34 वर्ष 2)राबिया शकील खान, वय 25 वर्ष 3)सरफराज शकील खान, वय 7 वर्षे 4)कुमारी अतिफा खान, वय 3 वर्षे

बातम्या आणखी आहेत...