आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न:बांधकाम विभातील कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याने अंगावर ओतले रॉकेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत मंत्रालयाबाहेर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप सदरील व्यक्तीने केला आहे. ​​​​​

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव राजू चन्नापा हुनगुंडे असे असून, तो हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांनी 1 कोटी 70 लाख रुपयांचे रस्त्याचे काम केले होते. मात्र बांधकाम विभागाकडून पैसे मिळत नसल्याने तसेच बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना त्रास दिल्या जात असल्याने त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या दोन महिलांना देखील ताब्यात घेतले आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली होती. मात्र, त्याकडून कोणत्याही प्रकारे याप्रकरणी तोडगा निघालेला नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मुंबई गाठत मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

हुनगुंडे यांनी वसमत तालुक्यात सुमारे आठ किलोमीटर रस्त्याचे काम केले आहे. त्यानुसार 1 कोटी 70 लाख रुपये त्यांनी मिळणे अपेक्षित होते. यासाठी त्यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा देखील केला, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली, त्यामुळे त्यांनी सहकुटुंबासह मंत्रालय गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

भटक्या समाजाचे असल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप राजू हुनगुंडे यांनी केला आहे. सात महिन्यांपासून पैसे बांधकाम विभागाकडून मिळालेले नाहीत. कर्ज घेऊन हुनगुंडेयांनी आठ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम केले, असे हुनगुंडे यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...