आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया:आधी अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा; बहुजन पोरं नको तिकडे, सुजात आंबडेकरांचं चॅलेंज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुडी पाडव्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. मशिदीवरुन भोंगे खाली हटवा, नाहीतर आम्ही मशीदीसमोर येऊन दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असे वादग्रस्त विधान राज ठाकरे यांनी भर सभेत केले.

राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याला सुजात आंबेडकर यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर टीका केली आहे. "पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा, आमच्या बहुजन पोरांना नको, असे म्हणत तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा करु नका", अशी विनंतीही सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना केली.

शनिवारी गुड़ी पाडव्याचे औचित्य साधत मुंबईत मनसेचा गुडी पाडवा मेळावा होता. त्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. मशिदीवरचे अनधिकृत भोंगे हटवायलाच पाहिजे. सरकारला मी सांगतो, यावर लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही मशीदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू, प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा. धर्म प्रसारासाठी लाऊड स्पीकरच लागतो, अशातला काही प्रकार नाही. प्राचीन काळी काय स्पीकरच होता काय?", असे म्हणत, राज ठाकरे यांनी मशिदीवरचे स्पीकर हटवा अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातल्या राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आज सुजात आंबेडकर यांची मुंबईत सभा पार पडली. या सभेत सुजात आंबेडकर यांनी ठाकरेंवर टीका केली.

सुजात आंबेडकर म्हणाले की, "काल कुणीतरी एक वक्तव्य केले, मशिदीवरचे भोंगे हटवा, नाहीतर आम्ही मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू.... राज ठाकरे यांच्या वक्तव्याला माझा 100 टक्के पाठिंबा... पण पहिल्यांदा अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा. तिकडे मला एक बहुजन पोरगा नको आहे..जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जातात, टीशर्ट काढून जाणवं दाखवा आतमध्ये आणि मग आतमध्ये हनुमान चालीसा म्हणायला जावा..."

पुढे सुजात आंबेडकर म्हणाले की, राज ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या. तुम्ही स्वतःचा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...