आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:शिंदेंचा चालक, भाजी आणणाऱ्यांना सुरक्षा, पण विरोधकांना सुरक्षा देणे सरकारला परवडत नसावे; सुनील राऊतांचा घणाघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे ड्रायव्हर, भाजी आणणारे यांना देखील सुरक्षा देण्यात आली आहे. चाळीस गद्दार आमदारांना दोन दोन गाड्या मागे पुढे ठेवलेल्या आहेत. मात्र विरोधकांना सुरक्षा देणे महाराष्ट्र सरकारला परवडत नसावे, असा टोला खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांकडेही यासंदर्भात संजय राऊत यांनी तक्रार दिली आहे.

कांजूरमार्ग ठाण्यात तक्रार

याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधु सुनिल राऊत यांनी कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, काल संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून व्हाट्सअप मेसेज आला होता. Ak47 याने दिल्लीला किंवा कुठेही मुसावालाला ज्याप्रकारे मारले तसे उडवू अशी धमकी संजय राऊत यांना आली होती.

दारूच्या नशेत धमकीचा मेसेज कसा?

सुनील राऊत म्हणाले, दारूच्या नशेत फक्त संजय राऊत यांनाच कसे मेसेज येतात. महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत भरपूर नेते आहेत, पण मग दारूच्या नशेत संजय राऊत यांनाच धमकीचा मेसेज कसा जातो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.

संदीपान भुमरेची औकाद काय?

संदीपान भुमरे यांनी याप्रकरणी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनिल राऊत म्हणाले, संदीपान भुमरेची औकाद काय आहे, त्याला इंग्रजी लिहिता-वाचता येत नाही. त्याला तो मॅसेज वाचता तरी आला का हे विचारा. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

सरकारकडून अपेक्षा नाही

सुनिल राऊत म्हणाले, संजय राऊत यांना असे अनेक धमक्यांचे फोन माझ्या घरी गेल्या सहा महिन्यापासून येत आहेत. वारंवार कंप्लेंट करून महाराष्ट्र शासनाने हे सर्व स्टंट म्हणून त्यावर लक्ष दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अशी सिक्युरिटी आम्हाला देईल अशी अपेक्षा नाही. सुरक्षा जरी मिळाली नाही तरी आम्ही शिवसेनेचे काम ठाम आणि मजबूतपणे करत राहू.

संबंधित वृत्त

सुरक्षेत वाढ:संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर