आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सर्वोच्च' निर्णयानंतर प्रतिक्रिया:सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले...

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यानंतर भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यासोबतच न्यायालयानं मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

दरम्यान भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करून निशाणा साधला आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम!' असं ट्विट करत नितेश राणेंनी जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

आदित्य ठाकरेंचे नाव सुशांत सिंह प्रकरणात आल्याचे वारंवार बोलले जात आहे. आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात काही तरी संबंध आहे असे आरोप भाजप नेत्यांकडून वारंवार केले जात आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीमध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला असेही विरोधकांकडून म्हटले जात होते.

बातम्या आणखी आहेत...