आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाची मनाई:मराठी पाट्या नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयास आणि अशा पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने, आस्थापनांचे नामफलक ठळक मराठीत करणे मुंबई महापालिकेने अनिवार्य केले होते. या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुनावणी करताना सर्वाेच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने मराठी पाट्यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता पालिकेला १८ डिसेंबर म्हणजे पुढील सुनावणीपर्यंत कारवाई करता येणार नाही. मविआ सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांनी पाट्या ठळक मराठी अक्षरात लावण्याचा निर्णय घेतला होता. यावर व्यापारी संघटनांनी मुंबई महापालिकेकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. मुंबई महापालिकेने ३ महिन्यांची मुदत दिली होती. दरम्यान, फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने मुंबई शहर हे कॉस्मोपोलिटियन असल्याने विविध भाषिक लोक इथे राहतात, असे म्हणत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत कारवाईला विरोध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...