आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा:एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणताही कारवाई करू नका, सुप्रीम कोर्टाचे ईडीला आदेश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकाची नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीची : प्रताप सरनाईक

मनी लाँडरिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ईडीने कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरासह 10 ठिकाणी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीबाबतसाठी सरनाईक यांना वारंवार नोटीस पाठवली होती. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत त्यांना दिलासा दिला आहे. सध्या ईडीने कोणतीही कठोर कारवाई करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाला आहे.

'ही लढाई माझ्या एकट्याची नाही'

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ईडीकडून होणाऱ्या चौकशीबाबत आक्रमक भाष्य केले. ही लढाई माझ्या एकट्याची नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची असल्याचे ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही माझ्या मागे उभे असल्याचा विश्वास दिला आहे, असेही सरनाईक म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser