आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र सरकारला झटका:हक्कभंग प्रकरणात गोस्वामींच्या अटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, विधानसभा सचिवांना नोटीस

नवी दिल्ली/ मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाईक प्रकरण : जामीन अर्जावर हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी

अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला झटका दिला आहे. कोर्टाने हक्कभंग प्रकरणात अर्णब यांच्या अटकेला शुक्रवारी स्थगिती दिली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने यासोबतच विधानसभा सचिवांना नोटीसही जारी केली आहे. ती विधानसभेच्या सचिवांनी अर्णब यांना लिहिलेल्या पत्राबाबत दिली आहे. हक्कभंगाची विधानसभेची नोटीस सुप्रीम कोर्टाला दाखवू नये, असा इशारा या पत्रात सचिवांनी अर्णब यांना दिला होता. विधानसभा सचिवांच्या विरोधात न्यायालयाची अवमानना केल्याची कारणे दाखवा नोटीस का जारी केली जाऊ शकत नाही, असा प्रश्नही कोर्टाने विचारला. महाराष्ट्राच्या विधानसभा सचिवांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केेलेल्या टीकाप्रकरणी अर्णब यांच्याविरोधात हक्कभंग नोटीस जारी केली होती.

नाईक प्रकरण : जामीन अर्जावर हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी
इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला. याचिका अपूर्ण आहे, अशी टिप्पणी शुक्रवारी न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली. याप्रकरणी न्यायालय शनिवारी पुन्हा सुनावणी करेल.