आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असून १५ आमदार बाद होणार असल्याचे ट्वीट केले. यावर उलट सुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी अंजली दमानियांच्या दाव्यावर एक सुचक विधान केले. १५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचे उत्तर माझ्याकडे नाही. आत्ता ऊन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासह ''ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे ट्वीट मी काही वाचलेले नाही. पण त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे.'' असे त्या म्हणाल्या.
अंजली दमानियांचे ट्विट
किती दुर्दशा होतेय लवकरच बघू
अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ''आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच बघू..... आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.''
अजित पवारांचे उत्तर
अजित पवारांनी अंजली दमानियांच्या दाव्यावर एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, ''एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार?''
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.