आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज मला सुषमा स्वराज यांची आठवण आली. त्या नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या. आणि आता अयोध्या दौऱ्यावर गेलेल्यांनी कुठली मर्यादा पाळली? असा सवाल उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल चढवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. मात्र शिवसेना-भाजपच्या या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुषमा ताई या मला अतिशय आवडतात. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे स्थान माझ्यासाठी अतिशय आदरणीय आहेत. संसदेत कसे वागावे हे त्यांनी आमच्या उमेदीच्या काळात आम्हाला शिकवले. आज मला सुषमा स्वराज यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे त्या नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या.
यांनी कोणती मर्यादा ठेवली
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आता रामाच्या देऊळाकडे सगळेच चाललेत मात्र मर्यादा कुणाकडे आहे? मर्यादा पुरुषोत्तम राम हे वागणे फक्त सुषमा ताईंकडे होते. आज हे जे जात आहेत त्यांच्याकडे मर्यादा आहे का, आणि यांनी कोणती मर्यादा ठेवली याचे आत्मचिंतन तुम्हीच करा, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावले.
शरद पवार यांनी अदानींवरुन घेतलेल्या भूमिकेवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेपीसीमध्ये सत्तेत असेलेले लोक जास्त असतात. संजय राऊत यांच्या हक्कभंग विरोधात जी कमिटी स्थापन केली आहे. त्यात सत्ताधारी लोक जास्त आहेत. ते त्याच्यापुढे काहीच बोलले नाही. अजित पवारांच्या अदाणींसोबतच्या फोटोवरुन होत असलेल्या टीकेवर सुळे म्हणाल्या, अदाणींसोबत माझाही फोटो इन्स्टाग्रामवर आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.