आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समजूत:पवारांच्या राजीनाम्यावरून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, एकाने रक्ताने लिहिले पत्र, सुप्रिया सुळेंनी हात जोडून केली विनंती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहित पवारांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची हात जोडून समजूत काढली.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाय बी सेंटरबाहेर गोंधळ घातला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी एका कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहिले. दोन दिवस निर्णयावर पुर्नविचार करण्यास आपण वेळ द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत आपण हा वेळ देऊया. रक्ताने पत्र लिहू नका आणि आपण सर्वांनी जेवण करून घ्या असेही त्या म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हात जोडून कार्यकर्त्यांची समजूत घातली.दरम्यान, कार्यकर्त्यांनी वाय बी सेंटरबाहेरच बसून राहण्याचा आग्रह धरला.

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान वाय बी सेंटरसमोर कार्यकर्त्यांनी पवारांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून जाेरदार आंदोलन केले.