आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस मिस्त्री यांच्या आठवणींना सुप्रिया सुळेंकडून उजाळा:30 वर्षांपूर्वीचा फोटो केला शेअर, म्हणाल्या- विश्वास बसत नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघाताने नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातून मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मिस्त्री यांना श्रद्धांजली देत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुप्रिया सुळे आणि सायरस मिस्त्री यांची चांगली मैत्री असल्याचे बोलले जाते. सुप्रिया सुळे यांनी जवळपास 30 वर्ष जुन्या मैत्रीची आठवणींना उजाळा देत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात सुळे आणि सायरस मिस्त्री यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट

पोस्ट करत त्यांनी लिहले आहे की, "अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही सर्व तुमची नेहमीच आठवण ठेवू. रेस्ट इन पीस सायरस,"असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, "आमच्यातून तू निघून गेला असलास तरी आमच्या हृदयातून जाणार नाही आहेस. रेस्ट इन पीस सायरस."

गडकरींची मोठी घोषणा

दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कारमध्ये बसताना सर्व लोकांना आता सीट बेल्ट अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भातला आदेश काढला जाणार आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर आल्या असून, त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, याचीही चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे.

सीट बेल्ट बंधनकारक

कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे. सीट बेल्ट न लावता पकडल्यास दंडही भरावा लागेल. याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यास दंड होता, परंतु आम्ही मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावाने अनिवार्य करणार आहोत, असे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...