आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. आर. पाटील यांची जयंती:'आबांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली आहे', आर आर पाटील यांच्या जयंती दिनी सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आर आर पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेले एक व्यक्ती होते. आर आर पाटलांना लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणायचे. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. आर आर पाटील यांना जाऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. आज आबांची जयंती आहे. या निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आबांची आठवण काढत एक भावनिक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व आमचे नेते आर. आर. आबांना आपल्यातून जाऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु आजही जनता त्यांची आठवण काढते. आबांनी एकवेळ आपल्या कुटुंबाला वेळ दिला नाही पण जनतेसाठी ते सतत उपलब्ध राहिले. दिवस असो की रात्र,त्यांच्याकडे आलेल्या माणसाला ते भेटायचे. त्याची आपुलकीने चौकशी करीत असत. त्याच्या समस्यांवर मार्ग काढत असत. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

तसेच सर्वसामान्यांशी जुळलेली ही नाळ आबांच्या राजकारणाची सर्वात मोठी शिदोरी होती. अफाट असा जनसंग्रह, लोकांच्या प्रश्नांची जाण आणि राज्यकर्त्याच्या ठायी आवश्यक असणारी कल्पकता हे गुण त्यांच्याकडे होते. आयुष्याचा मोठा काळ सत्तेत असून देखील त्यांचे पाय नेहमीच जमीनीवर राहिले. उलट त्यांच्याकडे आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ते अधिकच नम्र होत गेले. आबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली आहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आर आर पाटील यांनी त्यांच्या स्मृती, कृती आणि विचारांना विनम्र अभिवादन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...