आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला व बालविकास मंत्र्यांचा आरोप:यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय; अजित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशोमती ठाकूर काय म्हणाल्या होत्या?

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, राज्याच्या बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला जातोय. जर यशोमती ठाकुर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काही मागणी केली असेल तर ते यावर विचार करतील. राज्य सरकार याप्रती संवदेनशील असल्याने हा विषय लवकर हाताळला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या होत्या?
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमादरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं होत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. दरम्यान, यशोमती ठाकुर यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करत हे आरोप केले होते.

बातम्या आणखी आहेत...