आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषीमंत्री आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रीया ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आज दिली. ''महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया '' अशा शब्दात त्यांनी आपल्यावरील टीकेचा समाचार घेतला.
सुप्रिया सुळे यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यावरील टीकेनंतर आजही राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत आंदोलन केले असून राज्यपालांकडेही याबाबत निवेदन दिले आहे.
तीन ट्विट
सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित नाही
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात
प्रवृत्ती बाजूला टाकूया
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की, मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.
समंजपणाची भूमिका ही संस्कृती
सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की, याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र !
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.