आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंचे उत्तर:तो कौटुंबिक कार्यक्रम होता, एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न सोमवारी पार परडले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यावर निशाणा साधत म्हणाले की, राज्यात एसटी कर्मचारी आत्महत्या करताहेत, शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता, अशी त्यांनी टीका केली होती.

या सगळ्या प्रकारावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की तो एक कौटुंबित कार्यक्रम होता. आमच्या घरातल्या मुलीचे लग्न होते. त्यामध्ये, बाहेरचे कुणीच नव्हते, असेही त्या म्हणाल्या. तसेच एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो, त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर काय बोलणार? असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा सोमवारी 29 नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडला.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह झाला.

बातम्या आणखी आहेत...