आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:सुरेंद्र गडलिंग यांना हायकोर्टाकडून जामीन, आईचे अस्थिविसर्जन करण्यासाठी दिली मुभा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा येथील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने १३ ते २१ ऑगस्टपर्यंत जामिनावर सोडले आहे.

गेल्या वर्षी सुरेंद्र यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन अद्याप झाले नाही. वकिलांनी मागील आठवड्यात न्यायालयात युक्तिवाद केला होता की, सुरेंद्र यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक एक तर रुग्णालयात दाखल आहेत किंवा होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराशी संबंधित काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. त्या सुरेंद्र यांच्या आईच्या १५ ऑगस्टला होणाऱ्या पहिल्या पुण्यतिथीला पार पाडल्या जाव्यात आणि त्या सुरेंद्र यांनीच पार पाडाव्यात, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्यानंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या पीठाने सुरेंद्र यांना सशर्त जामीन मंजूर केला. सुरेंद्र यांना जून २०१८ मध्ये एल्गार परिषद प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...