आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Surrounded By Nawab Malik; Raid On 29 Properties In Mumbai Related To Dawood, Chhota Shakeel's Saree, Haji Ali Dargah Trustee In Custody

मलिक यांना पुरते घेरले:दाऊदशी संबंधित मुंबईतील 29 मालमत्तांवर NIAच्या धाडी;  छोटा शकीलचा साडू, हाजी अली दर्ग्याचा ट्रस्टी ताब्यात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवर्ल्डशी साटेलोटे व अवैध व्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांना राष्ट्रीय तपास संस्थेने पुरते घेरले आहे. सोमवारी एनआयएच्या पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबई २५ आणि मीरा-भाईंदर परिसरात ५ अशा एकूण २९ ठिकाणी धाडी टाकल्या. याप्रकरणी दाऊदचा राइट हँड छोटा शकीलचा साडू सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट आणि हाजी अली दर्ग्याच्या एका विश्वस्ताला ताब्यात घेण्यात आले.

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट मालिकेमागे दाऊदचा हात आहे. एनआयए पथकाने बोरिवली परिसरातील बिल्डर अजय गोसालियाच्या घराचीही झाडाझडती घेतली. हा आधी क्रिकेट सट्टेबाजीचे काम करीत होता. तर भेंडी बाजार भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट, हाजी अली आणि माहिम दर्ग्याचा विश्वस्त साेहेल खांडवानी याला माहिममधील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. एनआयए पथकाने खांडवानीच्या माहिमस्थित कार्यालयाची झडती घेतली .त्याच्याशी संबंधित बिल्डर अस्लम सोराटिया आणि मांस निर्यातदार फरीद कुरेशी याच्यासह अनेकांची चौकशी केली.

दाऊदच्या हस्तकाच्या कंपनीशी ३०० कोटींचा व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर आरोप
दाऊदची बहीण हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून तिच्याशी संबंधित मालमत्ता मलिक यांनी खरेदी केलेल्या आहेत.

कुर्ला येथील मालमत्ता दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे मलिक हे मालक आहेत हसीना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबीयांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण मनी लाँड्रिंगचे असल्याचा ईडीचा दावा आहे.

मुंबईमध्ये २५ अन् मीरा-भाईंदर परिसरात ५ ठिकाणी धाडसत्र
एनआयएच्या पथकाने सकाळपासूनच धडक कारवाईस सुरुवात केली. नागपाडा, भेंडी बाजार, सांताक्रुझ, माहिम आणि गोरेगाव या मुंबईतील ठिकाणांवर तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि इतर परिसरातील इमारतींमध्ये झडती घेण्यास सुरुवात केली.

प्रचंड रोकड, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
दाऊदशी संबंधित लोकांच्या इमारतींची झडती घेण्यात आली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रचंड रोकड, जमीनजुमला, मालमत्तांमधील गुुंतवणुकीसंबंधातील दस्तऐवज, बंदुका, शस्त्रास्त्रे एनआयएच्या हाती लागली आहेत.

चित्रपट निर्माता समीर हिंगोराचीही चौकशी : या छापेमारीत चित्रपट निर्माता समीर हिंगोरा याचेही नाव आहे. त्यालाही एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हिंगोरा यानेच अभिनेता संजय दत्त याला एके-५६ रायफल दिली होती. याप्रकरणी समीर हिंगोराला टाडा न्यायालयाने ९ वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

बातम्या आणखी आहेत...