आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात वीज क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहे. या बदलांना सामोरे जात शासकीय वीज कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. महापारेषणमध्ये आता ड्रोनच्या साहाय्याने वीज वाहिन्यांची तपासणी केली जाते. महावितरणदेखील स्मार्ट मीटर आणि आधुनिक जीआयएस माध्यमांतून बदल घडवून आणत आहे, तर महानिर्मितीचे सर्व संच मेरिड ऑडर डिस्पॅचमध्ये आले असून या संचांनी विक्रमी वीजनिर्मिती केली आहे. अशा अनेक बदलांमुळे महाराष्ट्रातील वीज क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी केले.
भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागातील उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य पॉवर २०४७ या अभिनव संकल्पनेअंतर्गत महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगग येथे नुकतेच ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक विजय सिंघल होते. या वेळी विविध योजनेतील लाभार्थींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान व मानव संसाधन विभागाने तयार केलेल्या अनुकंपा नियुक्ती पोर्टलचा शुभारंभ दिनेश वाघमारे आणि विजय सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात महावितरणचे संचालक डॉ. मुरहरी केळे, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, अनिल कोलप यांनी मार्गदर्शन केेले. याप्रसंगी महापारेषणचे संचालक कादरी, संचालक मानव संसाधन सुगत गमरेसह वरिष्ठ अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. नरेश गिते यांनी केले, तर आभार अरविंद भादीकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.