आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट करत अमृता फडणवीस, केतकी चितळे, कंगना रनोट यांच्यावर विखारी टीका केली आहे. अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर आक्षेप घेऊ शकाल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो असे म्हणत उर्फी जावेदवर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारेंची पोस्ट काय?
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्ट म्हटलंय की, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतs. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे, तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच.
महिलेला मारहाण करण्याची भाषा का?
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
अमृता फडणवीसांना तसे बोलाल का?
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना रनोट किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.