आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरण:रियाने पहिल्यांदाच माध्यमांसमोर मांडली बाजू, म्हणाली - सुशांत 2013 पासूनच डिप्रेशनमध्ये; त्याच्यावर प्रेम केले ही चूक : रिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया म्हणाली - हार्डडिस्कबाबत त्याच्या बहिणीलाच विचारा...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर स्वत:ची बाजू मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली, २०१३ पासूनच सुशांत तणावात होता. तेव्हा तो हरेश शेट्टी या मानसोपचार तज्ज्ञांनाही भेटत होता.

रिया म्हणाली, सुशांतसोबत युरोपला जात असताना विमानात बसायला भीती वाटते असे त्याने सांगितले होते. यासाठी तो मोडाफिनिल हे औषधही घेत होता. पॅरिसला गेल्यानंतर तीन दिवसांपर्यंत तो खोलीच्या बाहेर पडला नव्हता. तेव्हा खोलीमध्ये काहीतरी असल्याचे सुशांतने म्हटले होते. मात्र हे वाईट स्वप्नही असू शकते, असे मी त्याला म्हणाले होते. तेव्हापासून त्याच्यामध्ये बदल झाला.

हार्डडिस्कबाबत त्याच्या बहिणीलाच विचारा...
रिया म्हणाली, मी सुशांतच्या घरी असताना हार्डडिस्कमधून कोणताही डेटा डिलीट केलेला नाही. मी गेल्यानंतर सुशांतची बहीण तिकडे गेली होती. तिलाच याबाबत विचारावे. मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळ‌वण्याचा प्रयत्न केला नाही.

लपवण्यासारखे काही नाही
सुशांतवर मनापासून प्रेम करणे ही एकच चूक असल्याचे रियाने या मुलाखतीत म्हटले आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कुणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही ती म्हणाली.

ड्रग्ज पुरवठा : एनसीबी करणार २० जणांची चौकशी
मुंबई | सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ईडी व सीबीआयसोबतच नार्काेटिक्स नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) पथकही सामील झाले आहे. एनसीबी अधिकारी मुंबईत दाखल झाले. एनसीबी पथक ड्रग अँगलचे कोडे सोडवण्यासाठी २० जणांची चौकशी करू शकते. सूत्रांनुसार, संस्थेने ड्रग्ज पुरवठा प्रकरणी २० संशयितांची यादी केली आहे. यात गौरव आर्य, स्वेद लोहिया, जया साहा, एजाज खान, फारुख बटाटा, बकुल चंदानीसह इतरांचा समावेश आहे. सीबीआयने गुरुवारी रियाचा भाऊ शोविकची चौकशी केली. संस्था सुशांतसोबत राहणारे सिद्धार्थ पिठानी, कामगार दीपेश सावंत, स्वयंपाकी नीरज सिंह यांचे जबाब शोविकच्या जबाबाशी पडताळून पाहत आहे.