आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sushant Sing Case | Disha Salian Rape And Murder Mumbai | Marathi News | Which Minister's Bodyguard Was Outside The Flat When Disha Salian Was Raped; Question By Narayan Rane

राणेंची पत्रकार परिषद:दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते; नारायण राणेंचा सवाल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. तिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक तैनात होते. असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली. ते आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाविषयी काही सवाल उपस्थित केले. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

दिशा सालियनचे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. ही गोष्ट अभिनेता सुशांत सिंह राजपुतला कळाली. त्यानंतर त्याने याविरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला. मात्र, सुशांत सिंह यालाही त्याच्या घरी जाऊन ठार मारण्यात आले, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे.

पुढे नारायण राणे म्हणाले की, दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते? सात महिने उलटून गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पाने कोणी फाडली, कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता, असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केले आहे.

... म्हणून सुशांत सिंह राजपुतलाही ठार मारण्यात आहे
पुढे नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपुत प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बलात्काराची गोष्ट सुशांत सिंह राजपुतला समजली होती. तेव्हा त्याने मी कोणालाही सोडणार नाही, असे म्हणायला सुरूवात केली. त्यावेळी काहीजण त्याच्या घरी गेले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर सुशांत सिंह राजपुत याची हत्या झाली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी सुशांत सिंह याच्या घराबाहेर होती? सुशांत सिंह राजपुत याच्या इमारतीत सीसीटीव्ही होते. परंतु, सुशांतच्या हत्येनंतर हे सीसीटीव्ही गायब झाले. सुशांतचा मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी ठराविक व्यक्तीची रुग्णवाहिका कशी आली? सुशांतचा मृतदेह रुग्णालयाता कोणी नेला? त्यानंतर पुरावे कोणी नष्ट केले. या सगळ्या तपासात कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता, याची आम्हाला माहिती आहे. मी हे सगळे पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देईन. असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...