आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरण:4 महिन्यांपूर्वीच सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना रियाबद्दल केले होते सतर्क, मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही; वकिलांचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता त्याच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वीच रिया चक्रवर्ती संदर्भात सतर्क केले होते. सुशांतच्या वडिलांनी वांद्रे पोलिस स्टेशनच्या डीसीपींकडे एक तक्रार केली होती. त्यामध्ये रिया चक्रवर्ती सुशांतला त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्यानेच हे प्रकरण आता पाटणात गेल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

रिया आणि मुंबई पोलिसांवर केले गंभीर आरोप

वकिलांनी केलेल्या आरोपानुसार, रिया सुशांतला कंट्रोल करत होती. सुशांतला ती कुटुंबियांशी बोलू देत नव्हती. तिने सुशांतला कुटुंबियांपासून दूर केले होते. या क्राइमसाठी रियाने दूरची प्लॅनिंग केली होती. ती सगळ्या मेडिकल फायली घेऊन गेली होती. तो कमकुवत होता तेव्हा तिने त्याचा फोन देखील ब्लॉक केला होता.

सुशांतचे वडील विकास सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, "कुटुंबियांना एफआयआर दाखल करण्यासाठी दीड महिना लागला. कारण, कुटुंबीय मानसिक धक्क्यात होते. मुंबई पोलिसच आमच्यावर दबाव टाकत होते की या प्रकरणात मोठ-मोठ्या प्रॉडक्शन हाउसची नावे द्या." तपास दुसरीकडे नेण्याचा मुंबई पोलिसांकडून प्रयत्न केला जात होता.

पाटणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पाटण्यात आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो तेव्हा पोलिसांना एफआयआर दाखल करणे कठीण गेले. पाटणा पोलिसांनीच हा संपूर्ण तपास करावा अशी आमची इच्छा आहे. विकास सिंह यांनी यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानले आहे. त्यांच्याच निर्देशांवर ही एफआयआर दाखल करणे सहज बनले असे संकेत विकास यांनी दिले आहेत.

या लोकांची झाली चौकशी

सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती, संजना सांघी, मुकेश छाब्रा, आदित्‍य चोप्रा, कास्‍टिंग डायरेक्‍टर शानू शर्मा, संजय लीला भंसाळी, शेखर कपूर, महेश भट्ट, रूमी जाफरी अशा दिग्गजांची चौकशी झाली. मूळचा पाटण्याचा असलेला सुशांतचा मृतदेह मुंबईतील फ्लॅटमध्ये 14 जून रोजी सापडला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू फाशीने झाल्याचे समोर आले.