आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sushant Singh Rajput Case : It Is Unfortunate That Mumbai Police Did Not Take FIR For 2 Months, Home Minister Anil Deshmukh Should Resign, BJP Leader Demands

सुशांत प्रकरणाचा 'सर्वोच्च' निकाल:मुंबई पोलिसांनी 2 महिने एफआयआर न घेणे दुर्देवी, गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा, भाजप नेत्याची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे सध्या राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र निकालानंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांचीही तिच मागणी होती. मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर, आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर भाजपकडून अनिल देशमुखांवर निशाणा साधण्यात आला आहे.

माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले. 'महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस कमिश्नरांनी 2 महिने एफ आय आर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंग चा परिवार ला न्याय मिळेल' असे ट्विट त्यांनी केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...