आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीच्या सहाव्या दिवशी सीबीआयने सिद्धार्थ पिठानी, स्वयंपाकी नीरजसिंह आणि सुरक्षा रक्षकाची चौकशी केली. दोन पोलिसांनाही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, ड्रग अँगलच्या चौकशीसाठी ईडीने टॅलेंट मॅनेजर जया साहाला बोलावले आहे. प्रकरणात ड्रग अँगल रिया आणि साहा यांच्यातील चॅट लीक झाल्याने समोर आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत एनसीबीचे पथक रियाची चौकशी करू शकते. तपासाबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एक बैठक घेतली. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्तीने सांगितले की, रियाची तथाकथित ड्रग चॅट जर खरी असेल तर हे गुन्हेगारी प्रकरण आहे. रियावर त्वरित कारवाई व्हायला हवी.
रिया-श्रुतीचे मेसेज : सुशांतने ड्रग्ज सोडण्याचे सांगितले आहे
िरया-सुशांतच्या माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्यातील एक व्हॉट्सअॅप चॅट लीक झाले. यातून दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्याने मारिजुआना सोडण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे रिया सुशांतला मारिजुआना सोडण्यासाठीचे औषध देण्याचे सतत प्रयत्न करत होती.
ड्रग घेताना कधी पाहिले नाही : सुशांतचा सहकारी
सुशांतचा सहकारी अंकित आचार्य याने सांगितले, माझ्यासमोर त्याने कधी ड्रग्ज घेतले नाहीत. तो आरोग्याबाबत सजग राहत होता. प्रोटीन, कॅल्शियम व इतर जीवनसत्त्वांची तो नेहमी काळजी घेत असे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.