आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी हजेरी:दीपिका पादुकोणची नारकोटिक्स ब्यूरोच्या गेस्ट हाउसमध्ये चौकशी सुरू; श्रद्धा कपूरही NCB ऑफिसमध्ये पोहोचली, सारा अली खान थोड्याच वेळात पोहोचणार

7 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या तिन्ही अभिनेत्रींना 5-5 प्रश्न विचारले जाऊ शकतात

सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या चौकशीच्या संदर्भात बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी हजेरी होत आहे. दीपिका पादुकोणची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)च्या कोलोबा येथील गेस्ट हाउसमध्ये चौकशी सुरू आहे. तिकडे श्रद्धा कपूर एक्सचेंज बिल्डिंग मधील NCB च्या हेड ऑफिसमध्ये पोहोचली आहे. सारा अली खानलाही येथेच बोलावले आहे, थोड्याच वेळात ती येथे पोहोचू शकते. सारा घरातून निघाली आहे.

दीपिका ठरवलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटांपूर्वीच पोहोचली
सूत्रांनुसार दीपिका आणि रणवीर रात्री ताज हॉटेलमध्ये थांबले होते. मीडियापासून बचाव करण्यासाठी दीपिका छोटी गाडी घेऊन हॉटेलमधून बाहेर निघाली. रणवीर दूसऱ्या कारमध्ये थोडा दूरपर्यंत दीपिकासोबत आला होता.

या तिन्ही अभिनेत्रींना 5-5 प्रश्न विचारले जाऊ शकतात
सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकाची आधी एकट्यात चौकशी केली जाऊ शकते आणि त्यानंतर तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशला समोर बसवून तिची चौकशी केली जाऊ शकते. दुसरीकडे, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना सकाळी 10.30 वाजता एनसीबीच्या बॅलार्ड इस्टेटच्या मुख्य कार्यालयात बोलवण्यात आले आहे. तीनही अभिनेत्रींना 5-5 असा एकूण 15 प्रश्न विचारले जाऊ शकतात.

दीपिकाला विचारले जाऊ शकतात हे पाच प्रश्न -

 1. तुम्ही ड्रग्स खरेदी केले आहेत का? केले असतील तर कसे आणि कुठून?
 2. तुमचा मोबाइल नंबर कन्फर्म करा. करिश्मा प्रकाश आणि जया साहासोबत 2.17 ची चॅट तुमची आहे की नाही?
 3. तुम्ही करिश्माला कधीपासून ओळखता? तुमची आणि त्यांची भेट कशी झाली, सर्व सविस्तर सांगा?
 4. तुम्ही कधी त्यांना ड्रग्स मागवण्याविषयी म्हटले होते का?तुम्ही त्यांना कितीवेळा ड्रग्स खरेदी करण्यास सांगितले? तुम्ही ड्रग्स स्वतःसाठी खरेदी केले की, दुसऱ्यासाठी?
 5. तुम्ही करिश्माला पेमेंट केले होते?जर केले असेल तर त्याचे माध्यमा काय होते? कोको रेस्टॉरेंटच्या पार्टीमध्ये गेल्या होत्या, त्या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता का?

सारा अली खानला विचारले जाऊ शकतात हे प्रश्न -

 1. आपला मोबाइल नंबर कन्फर्म करा. सुशांत सिंह राजपूतसोबत तुमची भेट कशी झाली आणि त्यांच्यासोबत तुमचे नाते काय होते?
 2. सुशांत केदारनाथ चित्रपटावेळी ड्रग्स घेत होता का? त्याच्यासोबत तुम्ही कधी ड्रग्स घेतली का?
 3. तुम्ही सुशांतसोबत थायलँडला गेल्या होत्या का? तेथे तुम्ही ड्रग्स घेतल्या किंवा तुमच्या टीममधून कुणी असे केले का?
 4. सुशांतच्या पावना येथील फार्म हाऊसवर तुम्ही किती वेळा गेल्या होत्या? तुम्ही अशा कोणत्या पार्टीत सहभागी झाल्या का जिथे ड्रग्सचा वापर झाला?
 5. तुम्ही कधी कुणाकडून ड्रग्स खरेदी केली का? करमजीत उर्फ केजे नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? ते कधी तुमच्याजवळ ड्रग्स घेऊन आले का?

श्रद्धा कपूरला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात -

 1. सुशांत आणि रियासोबत पहिली भेट कधी आणि कशी झाली? तुम्ही कधी रिया सुशांतला ड्रग्स घेताना पाहिले होते का?
 2. 2 मार्च 2019 ला तुम्ही पावनामध्ये छिछोरे चित्रपटाच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या का? जर झाल्या होत्या तर त्या दिवशी पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता का, तुम्ही ड्रग्स घेतली होती का?
 3. जया साहासोबत तुमची भेट कशी झाली होती? एसएलपी कोण आहे, ज्याला तुम्हाला भेटायचे होते आणि का? तुमची त्यांच्याशी भेट झाली, जर झाली तर कितीवेळा?
 4. तुम्ही सीबीडी ऑयल ड्रग्स घेता का किंवा दुसऱ्या कुणासाठी मागवत होता? जया कोणत्या जिंदलच्या माध्यमातून तुम्हाला सीबीडी ऑइल पाठवण्याविषयी बोलत होती?
 5. तुम्ही करमजीत उर्फ केजेला ओळखता का? तो देखील तुमच्याजवळ ड्रग्स घेऊन आला होता का किंवा तुमच्यासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने कधी ड्रग्स खरेदी केली का?
बातम्या आणखी आहेत...