आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आव्हाडांचा सवाल:सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचे आता उघड,  महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे 'मराठी भैय्ये' आता माफी मागणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांतसिंग प्रकरणात सीबीआयला मदत करणा-या एम्सच्या पथकाने आपल्या अहवालात हत्येची शक्यता नाकारली आहे

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनाच्या 110 दिवसानंतर मोठा खुलासा झाला. या प्रकरणात सीबीआयला मदत करणा-या एम्सच्या पथकाने आपल्या अहवालात हत्येची शक्यता नाकारली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी आत्महत्येच्या दिशेने तपास केल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. आता यानंतर राज्यातील नेत्यांनी मुंबई पोलिसांविरोधात बोलणाऱ्यांना सवाल विचारायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

'सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?' असा सवाल जितेंद्र आव्हाडी ट्विटरवरुन विचारला आहे. मात्र यामध्ये 'मराठी भय्ये' म्हणून कोणाला संबोधले आहे याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

व्हिसेरामध्ये विष आढळले नाही
सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. 28 सप्टेंबर रोजी एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. माध्यमांतील वृत्तानुसार, एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही.