आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण:माजी मॅनेजरच्या मृत्यूचा रिपोर्टच गायब; कॉम्प्युटरमधून ते फोल्डरच डिलीट झाले : मुंबई पोलिस

मुंबई/दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपास सीबीआयला देणार नाहीच : गृहमंत्री देशमुख

अभिनेता सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाचे गूढ गहिरे झाले आहे. सुशांतच्या मृत्यूच्या ६ दिवसांपूर्वी ८ जूनला त्याची माजी सेक्रेटरी दिशा सालियानने मालाडमधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. रविवारी दिशाच्या कुटुबीयांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बिहार पोलिसांना कुणीही सापडले नाही. हे पथक मालवणी पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी दिशाच्या पोस्टमाॅर्टेम, फॉरेन्सिक आणि व्हिसेरा अहवालासह सीसीटीव्ही फुटेज आदींची मागणी केली. त्यावर ते सर्व डिलीट झाल्याचे उत्तर मालवणी पोलिस ठाण्याने दिले. दरम्यान, सुशांतचे सिमकार्ड््स त्याच्या नावावर नसल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

ते म्हणाले, मुंबई पोलिस सुशांतच्या कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेतच. बिहारमध्ये पाटणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला तरी सीआरपीसच्या १२ व १३ कलमांतर्गत घटना जिथे घडली त्या कार्यक्षेत्रातील पोलिस तपास करतात व त्याच न्यायकक्षेत हा खटला चालवला जातो.

कॉम्प्युटरमधून ते फोल्डरच डिलीट झाले : मुंबई पोलिस

बिहार पोलिस दिशाशी संबंधित दस्तऐवज पाहण्यासाठी मालवणी ठाण्यात गेले असता तेथील अधिकाऱ्याला एक कॉल आला. यानंतर सर्व दस्तऐवज ठेवलेल्या कॉम्प्युटरमधून ते फोल्डरच डिलीट झाल्याचे मालवणी ठाण्याच्या पोलिसांनी बिहार पोलिसांना सांगितले. दरम्यान, बिहार पोलिसांना रिया चक्रवर्तीचा पत्ता लागलेला नाही. रियाने ३ दिवसांपूर्वीच रात्री कुटुंबीयांसह फ्लॅट सोडल्याचे वृत्त आहे.