आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरण तपास:सुशांतची माहिती उघड केल्याचा आरोप सीबीआयने फेटाळला, आपल्याकडून काेणतीही माहिती गहाळ झालेली नसल्याचे केले स्पष्ट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणतीही व्यक्ती, माध्यमांना माहिती दिली नाही, सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयात केले स्पष्ट

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित माहिती उघड केल्याचे आराेप फेटाळून लावले आहेत. आपण कोणत्याही प्रकारची माहिती एखादी व्यक्ती वा माध्यम संस्थांना दिलेली नाही तसेच आपल्याकडून कोणतीही माहिती गहाळ झालेली नसल्याचे सीबीआयने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा सीबीआय, एनसीबी आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून तपास करण्यात येत आहे. या तिन्ही केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला त्या वेळी या प्रकरणाची माहिती माध्यमांकडे उघड केल्याचा त्यांच्यावर आराेप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर माहिती माध्यमांपर्यंत आल्यानंतर त्याचे ध्रुवीकरण होत असल्याचा दावा जनहित याचिकेत करण्यात आला आहे. याबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका करण्यात आली हाेती. या याचिकांवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या वेळी जनहित याचिकांतील आरोप फेटाळून लावले आहेत.

याअगाेदर झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांनी वृत्तवाहिन्या संवेदनशील माहिती प्रसारित करीत असल्याचा दावा केलेला हाेता. वृत्तवाहिन्यांना अशा प्रकारची माहिती कशी मिळते, असा सवाल करताना याचिकाकर्त्यांनी तपास यंत्रणा या माहितीचा साेर्स असतील असा आराेपही केला हाेता. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे.

माहिती गहाळ हाेण्याचा प्रश्नच नाही

अनिल सिंह म्हणाले, ‘केवळ सीबीआयच नाही, तर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनीही या प्रकरणाचा तपास गहाळ केलेला नाही. ही आमची जबाबदारी आहे आणि माहिती उघड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापूर्वीही तिन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते आणि माहिती गहाळ झाल्याचा इन्कार केला हाेता. जनहित याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये निवृत्त पोलिस अधिकारीही असून सुशांत प्रकरणाबद्दल वृत्तवाहिन्यांना माहिती दिली जात असल्याचा दावा केला आहे.