आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंचे आरोप:'दाल में कुछ काला है' मी फक्त युवा नेता असा उल्लेख केला, शिवसेनेचे नेतेच सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेताय - नितेश राणे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राजकारण सुरू आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान भाजपा नेते नितेश राणे वारंवार या प्रकरणात शिवसेनेवर लक्ष्य साधताना दिसत आहेत आता पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे. यामाध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

रियाने आदित्यचं नाव का घेतलं?

'दाल मै कुछ काला है' असं म्हणत त्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर संशय व्यक्त केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला फक्त आदित्य ठाकरेंचं नावच का घ्यावंसं वाटलं, त्यांना कधीच भेटलो हे का सांगावंसं वाटलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही सीबीआयला या दृष्टीनं तपास करण्याची विनंती करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचीदेखील आमची तयारी असल्याचंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेतेच या प्रकरणात आदित्य ठाकरेंच नाव घेत आहेत

तसेच पुढे नितेश राणे म्हणाले की, या प्रकरणात आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही नाव घेतलेलं नाही. मात्र शिवसेनेचे नेतेच या प्रकरणात आदित्य ठाकरेंच नाव घेत आहेत. आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचं नावच घेतलेलं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटले होते. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेत आहेत
नितेश राणे पुढे बोलतान म्हणाले की, अनिल परब यांनीच ट्विट करुन 13 तारखेला पार्टी झाल्याचं सांगितलं. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचं नाव घेताय आणि आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सर्वच जण हे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यासाठी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते मद्दामहून आदित्य ठाकरेंचे नाव या प्रकरणात घेत असल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरू
यासोबतच नितेश राणेंनी शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरू असल्याचा आरोपही केला आहे. शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जातोय. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जात असल्याचं ते म्हणाले. तसेच त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र शिवसेना रचत असल्याचंही ते म्हणाले. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागायला हवं असंही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...