आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणावरुन राजकारण:​​​​​​​भाजपद्वारे मोठा कट रचून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, गृहमंत्री अनिल देशमुखांचा आरोप

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशमुख म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने आपल्या सुनावणीदरम्यान हे ऑब्जरवेशन केले होते की, मुंबई पोलसांनी याप्रकरणी योग्य पद्धतीने तपास केला
  • त्यांनी म्हटले की, सुशांतविषयी खोटे पसरवण्यात आले यामागे भाजपचा हात आहे, त्यांनी पूर्ण राज्याच्या जनतेची माफी मागायला हवी

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या लीक झालेल्या अहवालानंतर अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू खून नव्हे तर आत्महत्या असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. त्यानंतर शंभर दिवसांहून अधिक काळ विरोधकांचे लक्ष्य ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारला भाजपवर पलटवार करण्याची संधी मिळाली आहे.

मंगळवारी मीडियासमोर आलेले गृहमंत्री अनिल देखमुख यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केले. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपने कट रचल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भाजपने प्रतिमा खराब करण्याचे काम केले
भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राज्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत देशमुख म्हणाले, "सुशांत प्रकरणाची मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केलेली नाही, असे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान असे निदर्शनास आणून दिले होते की मुंबई पोलिसांनी याप्रकरणी योग्यप्रकारे चौकशी केली आहे. तरीही मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले गेले.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठे षडयंत्र रचले
देशमुख पुढे म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या महामारीची साथ आहे आणि अशा वेळी एवढे राजकारण करणे योग्य नाही. सुशांतबद्दल पसरलेल्या खोट्या वृत्तांमागे भाजपचा हात आहे. बिहारच्या निवडणुकांकडे पाहता या प्रकरणातून राजकीय फायदा उचलण्यात आला. यासाठी भाजपने एक मोठे षडयंत्र रचले होते.

भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी
देशमुख यांनी भाजपला जनतेची माफी मागावी अशी मागणी करत म्हटले की, "आमचा मुद्दा असा आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. "

गुप्तेश्वर पांडेंचे नाव घेऊन फडणवीसांवर निशाणा
गृहमंत्री म्हणाले, "बिहार पोलिसांचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनीही महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे काम केले. आज बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहेत, ज्यात गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढवणार आहेत. माझा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आहे की, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे काम करणारे गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करण्यासाठी जाणार का? "

बातम्या आणखी आहेत...