आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत केसमध्ये मोठी कारवाई:​​​​​​​नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने सुशांतचा हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडाला घेतले ताब्यात, ड्रग्स प्रकरणात पहिल्यांदा रियाच्या घराची झडती

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनच्या अँगलने तपास करत आहे
  • एनसीबीने आतापर्यंत 5 लोकांना अटक केली आहे, त्यांनी रिया, शोविक आणि मिरांडासोबत कनेक्शन असल्याचे कबूल केले आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने सुशांतच्या हाऊस मॅनेजर राहिलेल्या सॅमुअल मिरांडाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी मिरांडाच्या घराची झडती घेतली होती. तिकडे एनसीबीची टीम रिया चक्रवर्तीच्या घराचीही झडती घेत आहे. एनसीबीने ड्रग्सच्या प्रकरणात जैद विलात्रा, अब्दुल बासित परिहारसह आतापर्यंत 5 लोकांना अटक केली आहे. असे बोलले जात आहे की, त्यांनी रिया आणि तिचा भाऊ शोविक आणि मिरांडासोबत कनेक्शन असल्याचे कबूल केले आहे.

अपडेट्स

  • एनसीबीच्या टीमने रिया आणि सॅमुअलच्या घरांमधील मोबाइल, हार्ड डिस्क आणि लॅपटॉपची तपासणी केली. रियाच्या कारची झडती घेण्यात आली.
  • असे बोलले जात आहे की, छापेमारीनंतर रियाचा भाऊ शोविकलाही ताब्यात घेतले जाऊ शकते.
  • एनसीबी ऑपरेशन सेलचे डिप्टी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले, 'हे सर्व एका प्रोसेसप्रमाणे होत आहे.'

ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत काय झाले?

  • एनसीबीने 5 लोकांना अटक केली आहे. गुरुवारी जैद विलात्राला कोर्टात हजर करण्यात आले होते. एनसीबीने कोर्टाला 10 दिवसांचा रिमांड मागितला, परंतु 9 दिवसाचा रिमांड मंजूर करण्यात आला. जैद याला 1 सप्टेंबर रोजी मुंबईहून अटक करण्यात आली होती.
  • अब्दुल बासित परिहार याला एनसीबीने अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बासित आणि जैदचे रियाचे सहकारी सॅम्युअल मिरांडाशीही संबंध आहेत. असे सांगितले जात आहे की या लोकांनी चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचे नाव घेतले आहे.
गुरुवारी जैद विलात्राला कोर्टात हजर करण्यात आले
गुरुवारी जैद विलात्राला कोर्टात हजर करण्यात आले
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser