आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:राजीव मसंद यांची चौकशी करत आहेत पोलिस, कोणाच्या तरी सांगण्यावरुन निगेटिव्ह आर्टिकल लिहिल्याचा आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या जवळच्या लोकांनी चौकशीमध्ये सांगितले की, राजीव त्याच्या चित्रपटांना निगेटिव्ह रिव्ह्यू देत होते
  • शनिवारी कंगना रनोटने मुंबई पोलिसांना विचारले होते की, राजीव मसंद यांना चौकशीसाठी का बोलवत नाही

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चित्रपट समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार राजीव मसंद यांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी ते सकाळी 11.50 वाजता वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाचा तपास करणारे तीन पोलिस अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

सुशांतच्या विरोधात नकारात्मक लेख लिहिल्याचा मसंद यांच्यावर आरोप  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या जवळच्या नातेवाईकांनी चौकशीत असा आरोप केला आहे की राजीव मसंद सुशांतच्या चित्रपटांना नकारात्मक समीक्षा देत असत. ते एखाद्याच्या सांगण्यावरून सुशांतविरोधात निगेटिव्ह ब्लाइंड आर्टिकल लिहित होते. याबद्दल सुशांत दु: खी आणि अस्वस्थ होत होता. 

या प्रकरणात पोलिसांना मसंद यांची बाजू जाणून घ्यायची आहे आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावरून खरोखरच वागत होते की नाही याचाही शोध घेतला जात आहे. तसेच सुशांतबद्दल लिहिलेल्या त्यांच्या लेखाचा स्रोत काय होता? हेही तपासले जाणार आहे. 

राजीव मसंदला समन्स का पाठवत नाही? कंगनाने केला होता सवाल 

सुशांत प्रकरणात आदित्य चोपडा, महेश भट्ट, करण जोहर आणि राजीव मसंद यांना समन्स का पाठविले नाही यासाठी शनिवारी कंगना रनोट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबई पोलिसांना सवाल विचारला होता. ती म्हणाली होती की, "मी असं म्हणत नाही की एखाद्याला सुशांतचा मृत्यू व्हावा अशी इच्छा होती. पण त्यांचा नाश व्हावा असे नक्कीच वाटत होते. हे लोक भावनिक गिधाडं आहेत. ते लोकांना उद्धवस्त होताना पाहू इच्छितात. महेश भट्ट हे आजवरच्या चित्रपटांद्वारे परवीन बाबींचा आजार विकत आले आहेत. मुंबई पोलिस आदित्य चोपडा, महेश भट्ट, करण जोहर आणि राजीव मसंद यांना समन्स का पाठवत नाहीत? ते चौघेही पावरफूल आहेत म्हणून का? असा सवाल कंगनाने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...