आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:'6 जूनपर्यंत सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते, नंतर त्याने जायला सांगितले', पोलिसांनी नोंदवला रिया चक्रवर्तीचा जबाब

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवले होते. चौकशीदरम्यान रियाने आपल्या जबाबात सांगितले की, 6 जूनपासून ती सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होती. परंतू, काही दिवसानंतर सुशांतने एकटे राहण्याचे कारण सांगत, तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची काल(ता.18) जवळपास 11 तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास 10 वाजता संपला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी त्याचे कर्मचारी, निकटवर्तीयांसह 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत. आपल्या जबाबात रिया चक्रवर्तीने म्हटले की, 'माझी सुशांतसोबत 2013 मध्ये ओळख झाली. त्यावेळी सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपट करत होता, तर मी 'मेरे डॅडी की मारुती' सिनेमा करत होते. या दोन्ही चित्रपटाचे सेट जवळ-जवळ असल्याने आमची त्या ठिकाणी भेट झाली. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि वेगवेगळ्या पार्टीमध्ये अनेक भेटी झाल्या. यानंतर आम्ही एकमेकांचे नंबर घेतले आणि अधून मधून भेटू लागलो. तेव्हा सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.'

पुढे रियाने सांगितले की, '2017-2018 च्या दरम्यान आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. सुशांत खूप विचारी होती. त्याच्या मनात सतत काही ना काही विचार चालत असायचा. पण, त्या तो कधीच त्याबाबत कोणाला सांगायचा नाही. त्याला काही टेंशन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुण्यातील त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा. तो सतत तणावात असायचा. त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला आणि तेव्हापासून त्याचे डिप्रेशनचे औषध सुरू झाले. पण, मागील काही काळापासून त्याने औषध घेणे बंद केले होते.'

'6 जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते. त्यावेळी तो पुन्हा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने एकटे राहण्याचे कारण सांगून, मला घरी जाण्यास सांगितले. मला वाटलं त्याला काही दिवस एकट्यात राहायचे असेल, म्हणून मी त्याच्या घरुन माझ्या घरी राहायला गेले. त्यानंतर थेट 14 जूनला त्याने आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडली आणि धक्का बसला. तो इतके टोकाचे पाऊल उचलेल, असे मला कधीच वाटले नव्हते,' अशी माहिती रियाने पोलिसांच्या जबाबात दिली आहे.

अनेकांचे जबाब नोंदवले आहेत

मुंबई पोलिसांसाठी सुशांतने आत्महत्या केलेल्या ठिकाणाचा पंचनामा आणि त्याच्या जवळील लोकांचा जबाबत खूप महत्वाचा होता. कारण, यांच्याच माहित्याच्या आधारे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकते. पोलिसांनी सुशांतसोबत त्याच्याच घरात राहणाऱ्या क्रिएटिव मॅनेजर सिद्धार्थ पीठानी,  सामान आणणारे दीपेश सावंत, दोन कुक आणि चाबी बनवणाऱ्या व्यक्तीसोबतच सुशांतचे वडील केके सिंह आणि दोन्ही बहिणींचा जबाब नोंदवला आहे.

सुशांतचा मित्र मेहश शेट्टीचा जबाब घेतला

पोलिसांनी सुशांतचा खास मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतने महेशला कॉल केला होता, पण त्याने रिसीव्ह केला नव्हता. रात्री 1 वाजता महेश सुशांतचा कॉल रिसीव्ह करुन शकला नाही, त्यानंतर त्याने सकाळी 12 वाजता सुशांतला कॉल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

महेशचा जबाब यासाठी महत्वाचा आहे, कारण महेश सुशांत आणि रियाचा कॉमन फ्रेंड होता. रिया आणि सुशांतचे नाते कसे होते, हे जाणून घेणे पोलिसांसाठी महत्वाचे आहे. पोलिसांनी सुशांतच्या डॉक्टरांचाही जबाब नोंदवला आहे, ज्यांच्याकडे सुशांत आपल्या डिप्रेशनचा उपचार करण्यासाठी जात होता. यासोबतच पोलिसांनी सुशांत्या शेवटच्या चित्रपटाचे डायरेक्टर मुकेश छाबराचाही जबाब नोंदवला आहे. छाबरासोबत 7 तास पोलिसांनी चौकशी केली, पण छाबराने सांगितल्याप्रमाणे, त्याला सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...