आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास कुठपर्यंत पोहाेचला हे समजले पाहिजे : संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या तपासाचे काय झाले ते केंद्राने सांगायला हवे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थेकडे (सीबीआय) सोपवण्यात होता. मात्र, सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) मार्फत त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे सगळे करत असतानाच सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहचला हे सुद्धा कळले पाहिजे, असा सवाल शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मोदी सरकारला केला.

राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एनसीबी ही राष्ट्रीय तपास संस्था आहे. या संस्थेचे काम राष्ट्रीय पातळीवर चालते. परदेशातून आपल्या देशात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असता. हे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करायचे एनसीबीचे काम आहे. मात्र, सध्या एनसीबीच्या कार्यालयात एकेकाला बोलवून चौकशी करण्याचे काम केले जात आहे. हे काम करण्यासाठी प्रत्येक शहर आणि राज्यात पोलिस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. तरीसुद्ध एनसीबी स्वत:हून स्थानिक पातळीवर तपास करते आहे. त्याला शिवसेनेची कोणतीच हरकत नाही, मात्र सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या तपासाचे काय झाले ते केंद्राने सांगायला हवे, अशी मागणी राऊत यांनी या वेळी बोलताना केली आहे.