आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतसिंह मृत्यू प्रकरण सीबीआयने घेतले हाती, मल्ल्याचा तपास करणाऱ्या एसआयटीकडेच जबाबदारी

नवी दिल्ली/मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद स्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणात केंद्राची अधिसूचना जारी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयने हे प्रकरण आपल्या हातात घेतले. तपास संस्थेने एफआयआर दाखल केला आहे. तपासासाठी विशेष पथक (एसआयटी) बनवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या एसआयटीने मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या आणि व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर कराराचा तपास केला होता, त्याच पथकाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, या एसआयटीचे नेतृत्व गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर यांच्याकडे असेल.

त्यांच्यासोबत गुजरात केडरच्याच महिला आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर आणि अनिल यादव असतील. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, बिहार पोलिसांनी रिया आणि इतर पाच जणांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात आतापर्यंत केलेला तपास आणि चौकशीचा तपशील सीबीआयला दिला आहे.

दिशाला ओळखत नाही : सूरज पांचोली

सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आलेले आरोप अभिनेता सूरज पांचोली याने फेटाळून लावले आहेत. सूरजने सोशल मीडियावर म्हटले आहे की,“मी कधीही दिशाला भेटलो नाही आणि तिच्यासोबत कधी पार्टीही केली नाही.” दिशासोबतच्या कथित छायाचित्राबद्दल तो म्हणाला की, “हे म्हणणे पूर्णपणे चूक आहे. छायाचित्रात दिसत असलेली मुलगी दिशा नाही, तर माझी मैत्रीण अनुश्री गौर आहे.