आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:बीएमसीने चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईला आलेल्या एसपींना केले क्वारंटाइन, नितीश कुमार म्हणाले- हे ठीक झाले नाही

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विनय तिवारींच्या हातावर क्वारंटाइन शिक्का लावत पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घरातच राहण्यास सांगितले

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवीन वळण समोर येत आहे. प्रकरणाच्या चौकशीत आता महाराष्ट्र आणि बिहार पोलिस आमने-सामने दिसत आहेत. तपासासाठी रविवारी मुंबईत आलेले पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)ने क्वारंटाइन केले आहे. त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारून पुढील आदेशापर्यंत एका घरात राहण्यात सांगितले आहे. ते यापुढे तपासणीसाठी कोणालाही भेटू शकणार नाहीत.

जबरदस्तीने क्वारंटाइन केले - बिहार पोलिसांचा आरोप

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी ट्विट केले की, "पोलिस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे अधिकृत कर्तव्यावरुन पाटण्याहून मुंबईला आले होते, परंतु त्यांना रात्री 11 वाजता बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने क्वारंटाइन केले. विनंती करूनही त्यांच्या आयपीएस मेसमध्ये रहाण्याची व्यवस्था केली नाही. आता त्यांना गोरेगावच्या एका गेस्ट हाउसमध्ये ठेवले आहे. याबाबत महाराष्ट्राच्या डीजीपीशी बोलले."

बीएमसीने नियमांनुसार केले क्वारंटाइन

बीएमसीने सांगितले की, आम्ही सरकारी आदेशाचे पालन करत आणि नियमांनुसार तिवारी यांना क्वारंटाइन केले आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना लक्षणे दिसू लागल्यास येत्या काळात त्यांची स्वॅब टेस्ट देखील केली जाईल.