आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल:ओरिजनल शिवसेनेशी भाजपने बेईमानी केली, रवींद्र धंगेकरांचा विजय त्याचीच परिणीती

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरिजनल शिवसेनेशी भाजपने बेईमानी केली. आणि आज याच गोष्टीची परिणीती म्हणजे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. महाविकास आघाडीला मोरल बुस्ट मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरुन सुषमा अंधारे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या पराभवाची जबाबदारी हेमंत रासने यांनी घेतली आहे. मविआच्या विजयानंतर आता विरोधक भाजप-शिवसेनेवर टीका करत आहेत.

धनशक्तीवर मिळवलेला विजय

सुषमा अंधारे म्हणाल्या, कसब्यातील विजय हा जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे. महाविकास आघाडीला मोरल बुस्ट मिळाला आहे. भाजप जोपर्यंत ओरिजनल शिवसेनेसोबत होती. तोपर्यंत कसब्यामध्ये त्यांचा विजय झाला. मात्र जेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत बेईमानी केली. तेव्हा ही ओरिजनल शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या बाजूने उभी राहिली. आणि आज याच गोष्टीची परिणीती आहे. रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करते.

गुलाल उधळत जल्लोष

रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. अनेकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. चोपडा शहरात काँग्रेस पक्षातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...