आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झुकेंगा नही साला घुसेंगा' असे म्हणत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि याचा तुम्हाला 7 वर्षे पत्ता लागला नाही असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत फडतूस गृहमंत्री अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हू मै झुकेंगा नही साला घुसेंगा''. सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत जनता अशा लोकांचा विरोध करत राहिल.
7 वर्षे कळले नाही
'फडतूस नही काडतूस हू मै झुकेंगा नही साला घुसेंगा' या डायलॉगवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव, अशा प्रकारची टीका त्यांनी केली.
त्यावेळी भक्त चिडले नाही
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांच्या बद्दल कोशारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत, पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले, असा टोला यावेळी सुषमा अंधारे यांनी लगावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.