आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निकालावरून टोला:महाराष्ट्रात आता धार्मिक मुद्दा वापरताना देवेंद्र फडणवीस 10 वेळा विचार करतील- सुषमा अंधारे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गरज नसताना बजरंगबलीचा मुद्दा काढला. मात्र, या सगळ्याचा तिथे काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड महाराष्ट्रात वापरताना देवेंद्र फडणवीस 10 वेळा विचार करतील, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावरही परिणाम

सुषमा अंधारे म्हणाल्या,कर्नाटकच्या विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रावरही परिणाम होईल. भाजपने निवडणुकीत धार्मिक कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कार्ड तिकडे चालले नाही.महाराष्ट्र हा तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आहे. महाराष्ट्रात लोक हे कार्ड अजिबात चालू देणार नाहीत. नक्कीच लोक यातून धडा घेतील. बजरंगबली हा राजकारणाचा विषय असू शकणार नाही. तो आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे.

महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजप अपयशी

सुषमा अंधारे म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी अशा सर्वसामान्यांशी निगडीत मुद्द्यांवर भाजप सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी तेथे बजरंग बलीचा मुद्दा काढला. भाजप जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरतो, तेव्हा तो धर्म आणि महापुरुष यांच्यामागे लपायचा प्रयत्न करतो.

मोदींनाही हरवता येऊ शकते

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह गृहमंत्री अमित शहा व अनेक केंद्रीय मंत्री व महत्त्वाचे नेते राज्यात तळ ठोकून होते. भाजपची सर्व भिस्त मोदी यांच्या करिशम्यावर होती. यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, कर्नाटकचा निकाल म्हणजे सगळ्यांसाठी एक संदेश आहे. 'मोदी है तो मुमकिन है' असे काहीही नसते. मोदींनाही हरवता येऊ शकते.

संबंधित वृत्त

कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 114 जागांवर पुढे, पक्षाने सर्व आमदारांना बंगळुरूत बोलावले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस 114 जागांवर, भाजप 73 जागांवर, जेडीएस 30 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या कलानुसार काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 30 आणि इतरांना 6 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर