आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीसांशी होऊ शकते, असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोघींनीही आपल्या चेहऱ्याची सर्जरी केल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची थेट राखी सावंतशी तुलना केली होती.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कंबोजचे इंटेन्शन चांगले नाही. त्याचे इंटेन्शन चांगले असते तर त्याने राखी सावंतची तुलना दुसऱ्या कोणाशी केली असती. कारण बिचाऱ्या राखी सावंतचे क्षेत्र सिंगिग, डान्सिंग, अॅक्टिंग हे आहे. काय तिचा मेकऑव्हर, लुक, भानगडी, फोटोशुट आणि आम्ही फोटोशुट केले ते 10 वीच्या परिक्षेसाठी हॉलटिकीट काढताना.
दोघींचे क्षेत्र एकच
सुषमा अंधारे म्हणाल्या, जर त्या बिचाऱ्या माऊलीची तुलना तिच्या क्षेत्रानुसार कोणासोबत होऊ शकते तर ती अमृतावहिनींसोबत होईल. राखी सावंतच्या चेहऱ्याची सर्जरी झाली, अमृतावहिनींच्या चेहऱ्याची देखील झाली. राखीताई गाणे गाते, अमृतावहिनी गाणे गातात, राखी सावंत डान्स करते अमृता वहिनी सुद्धा डान्स करतात, राखी सावंत मॉडेलिंग करते अमृतावहिनी देखील मॉडेल करतात, असा टोला त्यांनी लगावला.
नेमके काय आहे सावंत-अंधारे प्रकरण?
मोहित कंबोज यांनी ट्विट करत सुषमा अंधारेंवर हल्ला चढवला होता. कंबोज यांनी म्हटले होते, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा रंगते.
येथूनच या वादाला सुरुवात झाली. राखी सावंतने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणी खुर्चीसाठी नाटके करतात. थोडीतरी लाज वाटु द्या. यापुढे माझे नाव घेताना विचार करा, असा इशारा राखी सावंतने मोहित कंबोज यांना दिला.
संबंधित वृत्त
तुलना:सुषमा अंधारे-राखी सावंत दोघी बहिणी
षमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची थेट राखी सावंतशी तुलना केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वार-पलटवार रंगणार असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.