आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video मॉर्फ केलेला, मग ओरिजनल कुठे आहे?:महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांना संपवण्याचा कट - सुषमा अंधारेंचा आरोप

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणांमध्ये ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यातील कलमांचे स्वरूप पाहता पोलिसांचा अभ्यास कच्चा आहे की ठरवून शितल म्हात्रे यांचीच बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा प्रश्न निर्माण होण्यास वाव आहे. व्हिडिओ जर मॉर्फ केलेला असेल तर खरा कुठे आहे असा सवाल करीत महिलेच्या खांद्यावर बंदुक ठेवून विरोधकांना संपवण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून सध्या ठाकरे गटावर टिका केली जात आहे. या टिकेनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोपांच्या फैरी झडत आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पदाधिकाऱ्यावर शितल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ मॉर्फ केल्याचा आरोप एकीकडे होताना दुसरीकडे खऱ्या व्हिडिओबाबतही सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे म्हणाल्या, म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आयटी सेक्शन 67 ए दाखल केले आहे. तसेच 354 चा गुन्हा दाखल केला आहे. याचा अर्थ कुठलीही लैंगिक कृती प्रसारित प्रचारित करणे असा होतो. पण याचाच दुसरा अर्थ पोलीस लैंगिक कृती झाली आहे असे मान्य करतात असाही होतो. जर लैंगिक कृती झाली आहे असे मान्य केले तर मग सार्वजनिक ठिकाणी अशी कृती करणे हा कलम 294 नुसार गुन्हा होत नाही का ?

प्रकाश सुर्वे फ्रेममध्ये कुठेच नाही

सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केला की, व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दिसतात. मात्र, यातील प्रकाश सुर्वे फ्रेममध्ये कुठेच नाहीत आणि सगळीकडे शितल म्हात्रेच बाजू का मांडतात. यामध्ये एकाच व्यक्तीची ठरवून बदनामी केली जात आहे किंवा महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे असा अर्थ होतो.

पोलिसांचा अभ्यास कच्चा

सुषमा अंधारे म्हणाल्या, शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणांमध्ये ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यातील कलमांचे स्वरूप पाहता पोलिसांचा अभ्यास कच्चा आहे की ठरवून शितल म्हात्रे यांचीच बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा प्रश्न निर्माण होण्यास वाव आहे.

सार्वजनिक ठिकाणी अशी कृती गुन्हाच?

सुषमा अंधारे म्हणाल्या, या प्रकरणांमध्ये आयटी सेक्शन 67 ए दाखल केले आहे तसेच 354 अस दाखल केले आहे. याचा अर्थ कुठलीही लैंगिक कृती प्रसारित प्रचारित करणे असा होतो. पण याचाच दुसरा अर्थ पोलीस लैंगिक कृती झाली आहे असे मान्य करतात असाही होतो. जर लैंगिक कृती झाली आहे असे मान्य केले तर मग सार्वजनिक ठिकाणी अशी कृती करणे हा कलम 294 नुसार गुन्हा होत नाही का?

बातम्या आणखी आहेत...