आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिवार:भाजप नेत्यांना सावरकरांबद्दल प्रेम असेल तर अहमदाबादचे नामांतर करून दाखवा; गौरव यात्रेवरून सुषमा अंधारेंचे आव्हान

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्यांना सावरकरांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना सावरकर गौरव यात्रा काढायची असेल तर आधी त्यांनी अहमदाबादचे नामांतर सावरकरनगर असे करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज (ता. 2) केले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या अनुद्वगारामुळे सावरकरांचा अपमान झाल्याचा आरोप भाजप करीत आहे. यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन पक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेवरून विरोधकांकडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका होत आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौरवर यात्रेवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, सावरकर गौरव यात्रा नाही तर अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानींवरून लोक प्रश्न विचारतील याची भिती वाटते, म्हणून त्यांनी ही सावरकर गौरव यात्रा काढली आहे.

भगुरची दुरावस्था का झाली?

भाजपच्या लोकांना सावरकरांबद्दल जर नितांत प्रेम असेल तर सावरकरांच्या नाशिकमधील भगूर येथील जन्मस्थळाची दुरवस्था का झाली? तिथे भाजपने काय मोठे दिवे लावले?. का तिथे मोठे स्मारक उभारले गेले नाही? खरेच भाजप नेत्यांमध्ये सावरकरांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना सावरकर गौरव यात्रा काढायची असेल तर आधी त्यांनी अहमदाबादचे (गुजरात) नामांतर सावरकरनगर असे करुन दाखवावे.

भाजपने जनतेला वेठीस धरले

छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत अंधारे म्हणाल्या की, “संभाजीनगरमध्ये भाजपने ठरवून महाविकास आघाडीच्या सभेत विघ्न आणण्यासाठी तेथील जनतेला वेठीस धरले आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपने जाणीवपूर्वक सुरू केला आहे.