आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितूला नादचं लय बोलायचा:गप्पच बसत नाही, त्यांचे बोलणे अजिबात खोटे वाटत नाही- सुषमा अंधारेंची नितेश राणेंवर उपहासात्मक टीका

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''नितूला नादच लय बोलायचा..ते काही गप्पच बसत नाहीत. त्यांचे बोलणे अजिबात खोटे वाटत नाही.'' असा उपहासात्मक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार नितेश राणेंवर कणकवलीत लगावला. ''माझे दोन बारके बारके भाचे म्हणत नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचा आपल्या खास ढंगात त्यांनी समाचार घेतला.

सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात होत्या. त्यावेळी त्यांनी राणेंच्या होमपीच असलेल्या कणकवलीत नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका केली.

साबरमतीच का दाखवतात?

सुषमा अंधारे म्हणाल्या, सावरकरांबद्दल भाजपला प्रेम आहे हे दाखवण्याचे काम नितेश राणे करतात. सावरकरांना भाजप सरकारने भारतरत्न का दिला नाही. विदेशी पाहुणे भारतात येतात तेव्हा ते भारत दाखवतो म्हणत साबरमतीचा आश्रम दाखवतात. पण तेच मोदी परदेशी पाहुण्यांना सावरकरांचे जन्मस्थळ भगूर येथे नेले का? का त्यांनी तेथे नेले नाही. वर्धा आणि साबरतमीच्या महात्मा गांधींच्या आश्रमात जाण्याची गरज पडली.

मला भान आहे

सुषमा अंधारे यांनी आरोप करताना म्हणाल्या, मी कणकवलीत बोलतेय याचे मला भान आहे. कणकवली ज्या महान नेत्यांच्या नावाने ओळखली जात होती. शांतता प्रिय होती, जिल्हाही शांतताप्रिय होता परंतु, आज जिल्ह्यात गुंडागर्दीला सुरूवात झाली व ती वाढली.

फडणवीसांवर टीकास्त्र

सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना सवाल केला की, भाजपने किरीट सोमय्यांना समजून घ्यावे, त्यांना मंत्री पद देऊन त्यांचे पुनर्वसन करायला हवे. अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे चुकलेले आहे.

सोमय्या कंत्राटी कामगार का?

सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का? ईडीने त्यांना कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का?

बातम्या आणखी आहेत...