आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेंदीवाला आणि गजरेवाल्याचा हिशेब मागणारे बीकेसीवर कारोडो रुपयांचा चुराडा झाला त्याचा हिशेब कधी देणार आहेत, नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कधी हातोडा मारणार, भाजप आणि मित्रपक्षातील लोकांना कधी हिशेब मागणार, या माझ्या तीन प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत, असे आव्हान शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या आणि शिंदे गटाला दिले आहे.
अंधारे म्हणाल्या, अनिल परब यांच्या बंगल्याबद्दल तुम्ही बोलता. तो फार लांबचा पल्ला आहे. त्याआधी नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? हाच एक प्रश्न मी वारंवार तुम्हाला विचारत आहे. तुम्ही इतरांना हिशेब विचारता तेव्हा भाजप आणि मित्रपक्षांतील लोकांना हिशेब कधी मागणार आहात? जो पक्ष रजिस्टर्डच झाला नाही त्या पक्षाचा बीकेसीत मेळावा झाला. त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले. तो खर्च कुणाच्या खात्यातून झाला यावर का बोलत नाही, असा सवालही त्यांनी सोमय्या यांना केला. भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना तुम्ही सरकार स्थापनेपूर्वी माफिया म्हणत तुमचा गळा सुकला होता. त्यांच्यावर का बोलले जात नाही, असा सवालही अंधारे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.