आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ:11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडेल, ज्यातून फडणवीसांना मोठा धक्का बसेल; सुषमा अंधारे यांचा नवा दावा

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडणार आहे. देवेंद्र फडणवीसांना धक्का बसेल असे काहीतरी ते असेल, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी केला आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेवर अजून निकाल आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या राजकीय बदलाचे संकेताचे अंदाज अनेकजण वर्तवत आहेत.

चित्र स्पष्ट झालेले असेल

यामध्ये आता ठाकरे गटाची धडाडती तोफ असे ज्यांना म्हटले जाते त्या सुषमा अंधारे यांनी एक नवा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. यात सूषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, 11 ते 13 मे च्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला, तरी आश्चर्य वाटू नये. एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणे, गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणे किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणे, आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते. 11 ते 13 मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल.

पक्षाची प्रतिमा खराब

सूषमा अंधारे पुढे म्हणाल्या, पुन्हा येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जिवाचा आटापिटा केला. आताही करत आहेत. पण, दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली आहे. आता बास. कारण, फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत तर बाजारच उठला आहे.