आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसचा खुलासा:दहशतवादी जान मोहम्मदचे 20 वर्षांपासून दाऊदच्या कंपनीसोबत संबध, तो आमच्या नजरेत होता; महाराष्ट्र एटीएसने केला खुलासा

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईमध्ये रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईतील आहे. हा दहशतवादी मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. यानंतर विरोधकांकडून एटीएसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दहशतवादी मुंबईत असताना एटीएस झोपली होती काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. आता या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेत अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याच्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

जान मोहम्मद शेखचे 20 वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा महाराष्ट्र एटीएसने केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण 6 जणांना अटक केली आहे. यामधील जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांना लक्ष्य केले जात होते. यासंदर्भात एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

तो आमच्या नजरेत होता...
महाराष्ट्र एटीएसने माहिती दिली की, 'दिल्ली पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. यामधील एक व्यक्ती ही मुंबईच्या धारावमधील आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानातील डी कंपनीसोबत त्याचे संबंध असल्याचे अनेक रेकॉर्ड आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे. तो आमच्या नजरेत होता. मात्र दहशतवाद्याच्या कटबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती' असं विनीत अगरवाल यांनी सांगितले.

मुंबईमध्ये रेकी झालेली नाही
अगरवाल पुढे बोलताना म्हणाले की, 'मुंबईमध्ये रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू' असे देखील अगरवाल म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...