आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेनी फिरवला ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय:परमबिर सिंह खंडणीप्रकरणी निलंबित अधिकारी मणेरे पुन्हा सेवेत

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला आहे. तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना आता सेवेत सामावून घेतले आहे. माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह खंडणी प्रकरणात त्यांना निलंबित केले होते.

पराग मणेरे यांचे परमबीर सिंह यांच्याशी संबंधित खंडणीप्रकरणात आरोप झाल्यानंतर निलंबन करण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृहखात्याकडून आदेश काढण्यात आला आहे.

शिंदे सरकारचा आदेश
शिंदे सरकारचा आदेश

का केले होते निलंबन?

कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी राज्य सरकारनं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सेवेतून निलंबित केले होते. खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. परमबीर सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना त्यावेळी त्यांनी काही व्यावसायिकांकडून खंडणी मागितले असल्याची तक्रार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यासोबतच ठाणे शहराचे डीसीपी असलेले पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले होते.

शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारने ठाकरेंना आणखी एक दणका दिला आहे.

यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

बातम्या आणखी आहेत...