आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव:ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या 8 प्रवाशांपैकी 5 जण मुंबईतील तर पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील एकाचा समावेश

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रिटनमधून परतलेल्या या 8 प्रवाशांपैकी 5 जण मुंबईतील असून पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. सध्या या सर्वांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...