आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितळेची 'सोशल कामगिरी':ही आहेत केतकी चितळेची आतापर्यंतची सर्वांत वादग्रस्त विधाने, पवारांवरील वक्तव्यामुळे आली अडचणीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझं माझं ब्रेकअप' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री केतकी चितळे कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मते मांडत असते. अनेकदा यावरून तिला ट्रोलही केले जाते.केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनले आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिची फेसबुक पोस्ट वादाचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज आपण ही केतकी चितळे नेमकी कोण आहे आणि तिने आतापर्यंत केलेल्या वादग्रस्त विधानांवर एक नजर मारू...

छत्रपती शिवाजी महाराजांचा एका स्टँडअप कॉमेडियनने एकेरी उल्लेख केला होता. तो वाद ताजा असतानाच या मुद्यावरून अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली होती. तिची ही पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. केतकीने लिहिल होते की,

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

केतकीने आपल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अक्षरश: तिला झोडपून काढले होते. याच केतकीने आता औपचारिकता आणि आदर यातील फरक समजवणारा व्हिडीओ शेअर केला होता.

केतकीने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटले होते, की

आपल्या देशात, तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातलीत तर ते धर्म स्वातंत्र आहे. किरपान (एक छोटा चाकू) सिखानी ठेवला, तर ते धर्मात लिहीलय. आम्ही कंदमूळ खाणार नाही, म्हणून जैन मेनू वेगळा असतो, ते धर्म पालन. अग्नी मंदिर फक्त आमचे प्रार्थना स्थान आहे, दुसऱ्याना परवानगी नाही त्याच्याजवळ यायची, असं म्हणत पारसी आपला धर्म जपतात. चर्च मधील फादर, फक्त यशु बद्दल नव्हे तर राजकारण आणि बाकी धर्म (एक टारगेट धर्म, समजून घ्या कुठला) कसे वाईट, यावर भाष्य करतात, पण ते त्यांचं सरमन म्हंटलं जातं.

नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो. ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू' असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय. जागे व्हा जरा.

मी सर्वप्रथम एक भारतीय आहे, मी हिंदू विचारसरणीचे पालन करते. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे.

केतकीची नवबौद्धावरील वादग्रस्त पोस्ट
केतकीची नवबौद्धावरील वादग्रस्त पोस्ट

पालघर साधू हत्यांकाडानंतर तीन पोस्ट केले होते.

पालघर हत्याकांडवर पोस्ट
पालघर हत्याकांडवर पोस्ट

केतकीने शरद पवार यांच्यावर टीका केली. सोशल मिडियावर केतकीच्या पोस्टनंतर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दलची पोस्ट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दलची पोस्ट

मराठी भाषेवरून झाली होती ट्रोल -

केतकीने एका फेसबूक लाईव्हमध्ये बोलताना आपण हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे येथे उगाच मराठीचे झेंडे नाचवू नका असे विधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. तिच्या हिंदीवरील भूमिकेमुळे वाद निर्माण झाला होता.

केतकी चितळे नेमकी कोण आहे?

केतकीने छोट्या पडद्यावरील तुझं माझं ब्रेकअप’या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. एपिलेप्सी या आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. एपिलेप्सी या आजारावर केतकी उपचार घेत असून तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’असे ठेवले आहे.